२० ऑगस्टपर्यंत १ लाख कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात

0
159

 

पुणे, दि. २८ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. दहा दिवसांचा लॉकडाऊनही केला. मात्र यानंतरही पुण्यातील रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. 31 जुलै रोजी पुण्यात बाधित रुग्ण 60 हजारावर जाईल. तर, 27 हजार अ‍ॅक्टिव रुग्ण असतील. तर 20 ते 25 ऑगस्ट रोजी साधारण एक लाख कोरोनाबाधित रुग्ण असतील. यावेळी ॲक्टिव रुग्ण 48 हजार असणार आहेत. पुणे शहरात जिल्ह्यातील 30 टक्के रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी सुद्धा बेडव्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना रुबल अग्रवाल यांनी शहरातील कोरोना आणि उपाय योजनांची माहिती दिली. रुग्णांची माहिती वेळेवर न देणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या 25 रुग्णालयांवर यापूर्वी कारवाई केली. तर नुकतीच 10 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितलं. तर असिमटमॅटिक लक्षणं असलेल्या रुग्णांनी घरी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर माहिती अपडेट करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात रोज 12,411 सॅम्पल घेतले आहेत. तर मृत्यूदर 2.74 वरुन 2.38 वर घसरला आहे.

मात्र, रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मागणी वाढत आहेत. मात्र, जम्बो रुग्णालय झाल्यावर यावर गैरसोय टाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर कोव्