२०२२ मध्ये  भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास

855

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारताला स्वातंत्र्य मिळून २०२२ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. त्यादृष्टीने वैज्ञानिकांची तयारी सुरू असून इस्रोमध्ये वेगाने काम सुरू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) येथे केले. सर्व देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.