Desh

२०१९ ला भाजपच्या ५० टक्के खासदारांना तिकीट नाही?

By PCB Author

July 09, 2018

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – २०१९ ला मोदी पुन्हा दिल्ली काबीज करणार की नाही? भाजपचे किती खासदार निवडून येतील? मोदींना सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज लागेल का? अशा प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात आत्तापासूनच सुरु झालीय. पण मिशन २०१९ साठी भाजपची रणनीती काय असणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांपैकी तब्बल १५० खासदारांना निवडणुकीचे तिकीटच नाकारले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी यात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गज नावांचाही समावेश आहे. सुषमा स्वराज, राधामोहन सिंह, उमा भारती…केंद्रीय मंत्रिमंडळातले तीन दिग्गज मोहरे…२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या तिघांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आहे. सुषमा स्वराज किडनीच्या उपचारामुळे पुन्हा इतकी धावपळ करु शकणार नाहीत. राधामोहन, उमा भारती यांनी स्वत:च आपण लढायला उत्सुक नसल्याचे पक्षाला सांगितले आहे. पण हे केवळ तिघांपुरतेच नाही. २०१४ ला भाजपचे लोकसभेत २८२ खासदार निवडून आले होते, त्यातल्या जवळपास १५० खासदारांना भाजप तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.