२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री

0
1611

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – सर्वांना वर्षाअखेरचे वेध लागले आहेत. २०१८ ला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. काहीजणांनी  २०१९चे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. नववर्षात फिरायला जाण्याचे किंवा लग्नाकार्याचे नियोजन करायचे झाल्यास स्वाभाविक सुट्ट्या पाहणे  आलेच! यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे  हक्काच्या सुट्ट्यांना कात्री लागली आहे. तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे.  दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारधरून एकूण ९० पेक्षा  अधिक सुट्ट्यांचा योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांचा सुकाळ असणार आहे.

तर काही सार्वजनिक सुट्ट्यां रविवार आणि शनिवारी आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना यावर्षीप्रमाणेच फटका बसला आहे.  रविवार आणि दुसरा, चौथा शनिवारी आठ सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठ सुट्ट्या वाया गेल्या आहेत. रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंडची संधी चारवेळा मिळणार आहे.

दुसरा-चौथा शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या अशा आहेत –

जानेवारी (६ सुट्ट्या)

रविवार – ६, १३, २०, २७

शनिवार – ५, १२, १९, २६ ( प्रजासत्ताक दिवस)

फेब्रुवारी (७ सुट्ट्या)

रविवार – ३, १०, १७, २४

मंगळवार – १९ (शिवजयंती)

शनिवार – २, ९, १६, २३

मार्च (९ सुट्ट्या)

रविवार – ३, १०, १७, २४, ३१

सोमवार – ४ (महाशिवरात्री)

गुरूवार – २१ धुलिवंदन

शनिवार – २, ९, १६, २३, ३०

एप्रिल (९ सुट्ट्या)

रविवार – ७, १४ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), २१, २८

बुधवार – १७ (महावीर जयंती)

शुक्रवार – १९ (हनुमान जयंती, गुड फ्रायडे)

शनिवार – ६ (गुढीपाडवा), १३ (श्रीराम जयंती), २०, २७

मे (८ सुट्ट्या)

रविवार – ५, १२, १९, २६

बुधवार – १ (महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन)

शनिवार – ४, ११, १८ (बुद्ध पोर्णिमा), २५

जून (८ सुट्ट्या)

रविवार – २, ९, १६, २३, ३०

बुधवार – ५ (रमजान ईद)

शनिवार – १, ८, १५, २२, २९

जुलै (६ सुट्ट्या)

रविवार – ७, १४, २१, २८

शनिवार – ६, १३, २०, २७

ऑगस्ट (१० सुट्ट्या)

रविवार – ४, ११, १८, २५

सोमवार – १२ (बकरी ईद)

गुरूवार – १५ (स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन)

शुक्रवार – ३० ( महाराष्ट्रातील काही भागात पोळा या सणाला सुट्टी असते)

शनिवार – ३, १०, १७(पारशी नृतनवर्ष), २४(गोपाळकाला)

सप्टेंबर (१० सुट्ट्या)

रविवार – १(हरितालिका तृतीया), ८, १५, २२, २९(घटस्थापना)

सोमवार – २ (गणेश चतुर्थी)

गुरूवार – १२ (अनंत चतुर्दशी)

मंगळवार – १० (मोहराम)

शनिवार – ७, १४, २१, २८

ऑक्टोबर (१० सुट्ट्या)

रविवार – ६, १३(कोजागरी पोर्णिमा), २०, २७ (नरक चतुर्थी)

सोमवार – २८ (दिवाळी पाडवा)

मंगळवार – २९ (भाऊबीज)

मंगळवार – ८ (दसरा)

बुधवार – २(महात्मा गांधी जयंती)

शनिवार – ५, १२, १९, २६

नोव्हेंबर ( ७ सुट्ट्या)

रविवार – ३, १०, १७, २४

मंगळवार – १२ (गुरू नानक जयंती)

शनिवार – २, ९, १६, २३, ३०

डिसेंबर (८ सुट्टया)

रविवार – १, ८, १५, २२, २९

बुधवार – २५ ( ख्रिसमस)

शनिवार – ७, १४, २१, २८