Maharashtra

२०१९ नंतर मंत्रालयात येण्याची तुमच्यावर वेळच येऊ देणार नाही; धनगर समाजाच्या आमदाराचा पंकजा मुंडेंना इशारा

By PCB Author

January 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – धनगर समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत मंत्रालयात  प्रवेश करणार नाही, असे जाहीर विधान करणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (मंगळवार)  मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ  बैठकीला उपस्थिती लावली. त्यानंतर धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजांना अडवून मंत्रालयात येण्याबाबत जाब विचारला.

आमदार वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना यावेळी मंत्रालयात प्रवेश करताना अडवले आणि जाब विचारला. तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करत आहात. आज शब्द बदलून मंत्रालयाची पायरी चढला आहात. मात्र, २०१९ नंतर धनगर समाज तुम्हाला मंत्रालयात येण्याची वेळच येऊ देणार नाही’, असे त्यांनी म्हटले .

दरम्यान पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत बोलताना मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  पण धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, असे जाहीर विधान केले होते.