२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला इंधनदरवाढीची झळ ?

0
508

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – तेल निर्यात करणाऱ्या १४ मोठ्या देशांचे समूह आणि १० अन्य तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे २०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर इंधनदरवाढीची झळ सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे.  

कच्च्या तेलाच्या गेल्या काही दिवसातील घसरत्या किंमती लक्षात घेऊन तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन १.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात तेल उत्पादनाचा अर्धा भाग ओपेक  आणि सदस्य देशांकडूनच येतो. गेल्या दोन महिन्यात तेलाच्या किंमतीत ३० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे तेल उत्पादन घटवण्याचा निर्णय ओपेकच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, मोदी सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेलच्या किंमती २.५ रुपये प्रति लिटरनी कमी केल्या होत्या. राज्यांनाही तितकीच कपात करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले, तर त्याची मोठी झळ भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.