१ वस्तू, १ किंमत, देशभरात लवकरच नवा कायदा

0
400

नागपूर, दि.१३ (पीसीबी) – राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या संबंधी गृह विभाग सहा आठवड्यांच्या आत धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी देशात यापुढे एका वस्तूची छापील किंमत वेगवेगळी असू शकणाऱ नाही. एक ऑगस्टपासून केंद्राचा कायदा लागू होत आहे. या कायद्यामुळे वेगवेगळ्या दाराने मॉल-मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकता येणार नाही असे सांगितले.

असे असले तरी सुटे खाद्यपदार्थ वडा पाव, समोसे, पॉपकॉर्न, सँडविच अशा पदार्थांच्या किंमतीचे काय याबाबत सरकारने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. मॉल-मल्टिप्लेक्समधील खाद्य पदार्थांच्या चढ्या भावाबद्दलचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे आज विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला.

तेव्हा एक ऑगस्टपासून केंद्र सरकार कायदा करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या कायद्यानुसार छापील किंमतीपेक्षा वेगळ्या किंमती असणार नाही. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये वेगळ्या दराने खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत.