१९८७ मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ईमेलचा वापर; मोदींच्या दाव्याची सोशल मीडियावर खिल्ली    

0
433

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी आपण १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हा फोटो ईमेलच्या सहाय्याने पाठवला होता, असे पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. यावर मोदी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

मोदींच्या या दाव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. १९९५ च्या आधी ईमेल सेवाच उपलब्ध नव्हती, असे सांगितले आहे. ११९५ मध्ये अधिकृतपणे लॉन्च होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १९८८ मध्ये याचा वापर केला होता, असे एका युजरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्या मुलाखतीत मोदी यांनी  सांगितले की,  १९८७-८८ दरम्यान मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. त्यावेळी फार कमी लोक ईमेलचा वापर करत होते. आडवाणी यांची रॅली होती. त्यावेळी डिजिटल कॅमेऱ्याची साइज मोठा असायची. माझ्याकडे डिजिटल कॅमेरा होता. मी आडवणी यांचा फोटो काढला आणि दिल्लीला पाठवला. रंगीत पोटो प्रसिद्ध झाल्याचा पाहून लालकृष्ण आडवाणी यांना आश्चर्य वाटले होते.