Maharashtra

१७० आमदारांचा आकडा कुठून आणायचा हे शरद पवारांना ठाऊक आहे – संजय राऊत

By PCB Author

November 13, 2019

मुंबई,दि.१३(पीसीबी) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर संजय राऊतांनी माध्यामांशी संवाद साधला.

शरद पवारांना माहिती आहे १७० आमदारांचा आकडा कठून आणायचा ते, असं सूचक वक्तव्य महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लवकरच महाशिवआघाडी सरकार बनेल, असा दावा राऊतांनी यावेळी केला आहे.

दिलेला शब्द भाजपने पाळला नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार,असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लिलावती रुग्णालयातून संजय राऊतांना डिस्चार्ज देण्याआधी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.