१६ व्या वर्षी बॉयफ्रेंडने केला बलात्कार; अभिनेत्रीचा ३२ वर्षांनंतर गौप्यस्फोट

0
1608

न्यूयॉर्क, दि. २७ (पीसीबी) – प्रसिद्ध मॉडल, लेखिका, अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. वयाच्या १६ वर्षी तिच्यावर बलात्कार झाल्याचं पद्मा लक्ष्मीने सांगितले आहे. एका वृत्तपत्रात खुले पत्र लिहित ३२ वर्षांपर्यंत याबाबत मौन का बाळगले हे पद्मा लक्ष्मीने सांगितले.

या पत्रात पद्मा लक्ष्मीने म्हटले की, ‘तेव्हा मी एका २३ वर्षीय तरुणाला डेट करत होते. एकमेकांना डेट करू लागल्याच्या काही महिन्यांनंतर नववर्षाच्या संध्याकाळी त्याने माझ्यावर बलात्कार केला.’ या घटनेबाबत इतकी वर्ष कुठेच वाच्यता का केली नाही हेसुद्धा तिने या पत्रात सांगितले.

‘मी सात वर्षांची असताना माझ्या सावत्र वडिलांच्या एका नातेवाईकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही गोष्ट जेव्हा मी आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी मला आजी- आजोबांकडे राहण्यासाठी भारतात पाठवले. जर तुम्ही उघडपणे बोललात, अन्यायाविरोधात आवाज उठवलात तर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. या घटनेनंतर मी कोणावर सहजपणे विश्वास ठेवू शकत नव्हते. हे सर्व माझ्या जोडीदाराला आणि मानसोपचारतज्ज्ञाला सांगायलाही मला खूप वर्षे लागली,’ असे ती या पत्रात म्हणाली.