१५५ दुर्गसेवकांनी केले रक्तदान…

0
207

भोसरी,दि.०४(पीसीबी) – सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर व एम डी फिटनेस रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि.०३/०१/२०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिर संजीवनी ब्लड बँक भोसरी यांच्या सहकार्याने रावेत येते पार पडले.

शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून शिबिराला सुरवात करण्यात आली. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्रीचे मार्गदर्शक श्री.नंदकिशोर देशमुख, म्हाळुंगेचे सरपंच श्री मयूर भांडे, देहूरोड छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री यदुनाथजी डाखोरे व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रा.श्रमिक गोजमगुंडे आदी उपस्थित होते. अवघ्या ४ तासात प्रचंड प्रतिसाद देत तब्बल १५५ रक्तदातांनी रक्तदान केले.

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असताना सलग दुसऱ्यांदा शिबिराचा आयोजन करून यशस्वी रित्या पार शिबिर पाडणारी संस्था म्हणजेच सह्याद्री प्रतिष्ठान. तसेच लॉकडाऊन काळात सलग २ महिने सह्याद्रीचा महासंकल्प:भव्य रक्तदान शिबिर या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे १०० ठिकाणी रक्तदान शिबिराचा आयोजन करून तब्बल १०,२३३ बॅगा जमा करून महासंकल्प पार पडण्यात आला तसेच या महासंकल्पनेची दखल सुद्धा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली आहे.