Maharashtra

१४ एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा – जोगेंद्र कवाडे

By PCB Author

April 07, 2020

मुंबई,दि.७(पीसीबी) – १४ एप्रिलला घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा, असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.

१४ एप्रिल रोजी आपल्या घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करू नका. मी दरवर्षी जयंती निमित्त देशभर, राज्यभर फिरत असतो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे कुठेच जाणार नाही, असं कवाडे यांनी म्हटलं आहे.

मी ही माझ्या संपूर्ण परिवारासोबत येणाऱ्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोरोनाच्या महामारीमुळे घरीच साजरी करणार आहे. तुम्हीही करा अशी विनंती करतो, असं जोगेंद्र कवाडे म्हणाले आहेत‌.

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून साजरी केली जाते. मात्र या वर्षीच्या जयंतीवर करोना वायरसचे सावट आहे. यामुळे यावर्षी जयंती साधेपणाने आणि प्रत्येकाने घरीच साजरी करावी, असं आवाहन जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे.