Maharashtra

ह्रदयद्रावक: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेने स्वत:चे शरण रचून केली आत्महत्या

By PCB Author

November 16, 2018

भनगोजी, दि. १६ (पीसीबी) – बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भनगोजी येथे एका शेतकरी महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात स्वत: शरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१५) रात्री बाराच्या सुमारास घडली.

आशा इंगळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून त्या माजी सरपंचदेखील होत्या, असे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रा भनगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन आहे. मात्र, सत्तच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या कंटाळून गेल्या होत्या. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांनी त्यांच्या शेतातील गायीच्या गोठ्यात लाकडे एकत्र करुन त्यावर पांघरण्याच्या कपड्यांचे बारीक तुकडे टाकून सरण रचले व त्यावर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. आशा यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले असून एका मुलीचे लग्न झाले आहे. तर त्यांची दोन्ही मुले रोजंदारीवर काम करतात. आशा इंगळे यांच्यावर एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. दुष्काळामुळे यंदा आणखी परिस्थिती आणखी बिकट येणार, असे त्यांना वाटत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.