ह्दयद्रावक: दोघा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

0
372

दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – इमारतीच्या दहाव्या मजल्यावर साफसफाई करण्यासाठी गेलेल्या दोघा सफाई कर्मचाऱ्यांचा खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१७) दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीतील व्हिडीओकॉन टॉवर या इमारतीत घडली.

राजू शर्मा (वय २२) आणि अश्तियाक खान (वय २३, दोघे रा. दिल्ली) असे मृत सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास राजू आणि अश्तियाक हे दोघे  व्हिडीओकॉन टॉवर इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील काचेची साफसफाई करण्यासाठी गेले होते. दोघेही एका वायरवर बसले होते. ही वायर तुटल्याने दोघांचाही दहाव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला.  महत्त्वाचे म्हणजे दोघांनीही सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली नव्हती. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते किंवा सेफ्टी बेल्टही लावले नव्हते. स्वच्छता सुरु असताना सुरक्षेचे कोणतेही साधन तिथे उपलब्ध नव्हते. दिल्ली पोलीस तपास करत आहेत.