होळीच्या उत्सवा दरम्यान भाजप आमदारावर गोळीबार

0
748

लखीमपूर, दि. २१ (पीसीबी) – लखनौमधील लखीमपूर येथे होळीच्या रंगांचा उत्सव साजरा करत असताना झालेल्या वादातून भाजप आमदार योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत ते किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूर मतदारसंघातून योगेश वर्मा यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. कदाचित, त्यावरुनच वाद झाला होता. या घटनेनंतर योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार झाला यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. लखीमपूर खेरीचे जिल्हाधिकारी एस. सिंग यांनी याबाबत माहिती दिली असून आरोपीचा तपास सुरू असल्याचेही सांगितले आहे.