Pune

होर्डिंग लावून कोणाला तिकीट मिळत नाही – मुख्यमंत्री

By PCB Author

September 15, 2019

पुणे, दि. १५ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी  होर्डिंगबाजी करणे चुकीचे आहे. शहराच्या अध्यक्षांना मी याबाबत सूचना देखील दिल्या आहेत. तसेच होर्डिंग लावून कोणाला तिकीट मिळत नाही. असे होर्डिंग लावणाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाजनादेश यात्रा पुण्यात  आली. या दरम्यान, घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. महा जनादेश यात्रे मुळे शहरात ठीक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे.  त्यावर मुख्यमंत्री यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

माजी खासदार उदयन राजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.  या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये भरती सुरू राहणार आहे, असे सांगितले.  महाजनादेश यात्रेने आतापर्यंत ३,०१८ किमीचा प्रवास पूर्ण केला. १०७ मतदार संघात ही यात्रा आतापर्यंत पोहोचली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.