Pimpri

होर्डिंग्ज कोसळून घर, टपरी दबली, मोठी मनुष्यहाणी टळली

By PCB Author

April 29, 2022

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – दिघी आळंदी रस्त्यावर एक भलेमोठे होर्डिंग्ज कोसळून त्या खाली दोन घरे, पत्र्याची चहा टपरी असे दबून गेले. सुदैवाने या अपघातात नुकसान झाले, पण मनुष्यहाणी झाली नाही. महापालिकेने २० बाय २० ची परवानगी दिलेली असताना ४० बाय ४० आकाराचे अतिभव्य अवजड होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचे आढळले.

प्रचंड वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर आळंदिच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हे होर्डिंग्ज उभे होते. महापालिकेने अवघी २० बाय २० आकाराची परवानगी दिलेली असताना त्यांनी ४० बाय ४० आकारात ते उभे केले. परिणामी वाऱ्यामुळे ते होर्डिंग्ज कोसळले. मोठी मनुष्यहाणी झाली असती, पण होर्डिंग्ज कोसळताना आवाज झाल्याने लोक सावध झाले आणि जीव घेऊन पळाल्याने वाचले.