Desh

हैदराबाद बॉम्बस्फोटाप्रकरणी दोघे दोषी

By PCB Author

September 04, 2018

हैदराबाद, दि. ४ (पीसीबी) – हैदराबाद येथील गोकूळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे २००७ मधे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने आज (मंगळवार) दोघांना दोषी ठरवले आहे. तर सबळ पुराव्या अभावी इतर दोघांना दोषमुक्त केले आहे.

अनिक शफिक सईद आणि इस्माइल चौधरी असे दोषी ठरवण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हैदराबादमधील गोकूळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे २५ ऑगस्ट २००७ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ४२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी हैदराबादमधील न्यायालयात खटला चालवण्यात आला. तेलंगण पोलिसांनी या प्रकरणात तीन वेळा आरोपपत्र सादर केले. या प्रकरणात १७९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.