‘…हे बोलायला सोपं. आधी रेमडेसिव्हीर विमानातून आणले पण कुठे वाटले ते दाखवा’

0
524

अहमदनगर, दि.२० (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि नगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे खेळ चालू आहेत. दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंकेंना टोला लगवताना म्हंटल आहे कि, ‘कोरोना संकटाच्या काळात आमदार लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा जागतिक पातळीवर झाली. त्यामुळेच त्यांचा लंडन बूक ऑफ रेकॉर्डने सन्मानही करण्यात आला आहे. त्यावर बोलताना आम्हालाही लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळालं, मात्र आम्ही ते कुणाला दाखवत बसलो नाही.’

एवढंच नाही तर पुढे टीका करताना सुजय विखे पाटील यांनी असंही म्हंटल आहे कि, ‘कोरोना नियंत्रणासाठी आमदार किंवा खासदार काय करु शकतो? तर प्रत्येक शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्याने त्यांचं काम चोख बजावल्यामुळे नगरची लोकं आझ जिवंत आहेत. हे काही फक्त एका माणामुळे किंवा आमदार, खासदारामुळे नाही, अशी टीका सुजय विखे यांनी लंके यांच्यावर केली आहे. तसंच आम्ही कधीही आपण देव आहोत असं म्हणालो नाही.’

मात्र सुजय विखे पाटील यांनी केलेल्या या खोचक टीकेला आमदार निलेश लंके यांनीही जोरदार उत्तर दिलं आहे. ‘कोरोना संकटाच्या काळात 185 कोटींचा फायदा केला, तर 17 हजार लोक वाचवली हे बोलायला सोपं असतं. त्यांनी रेमडेसिव्हीर विमानातून आणले पण कुठे वाटले ते दाखवा’, असं म्हणत सुजय विखे पाटलांना लंकेंनी आव्हानच दिलं आहे. ‘आधी तालुक्यातील लोकांना भीती वाटत होती आता जिल्ह्यातील लोकांना भीती वाटत आहे’, असा टोलाही
न विसरता त्यांनी सुजय विखे यांना लगावला आहे. ‘त्यांच्या विखे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आपण नीट केलं आहे. वेळ आली तर आम्ही जिल्ह्यातही सक्षम आहोत’, असा थेट इशाराच लंके यांनी सुजय विखेंना दिला आहे.

मात्र, लंकेंच्या या इशाऱ्यामुळे निलेश लंके यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत तर दिले नाहीत ना? अशी चर्चा सध्या नगर जिल्ह्यात सुरु असून निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके यांना अहमदनगर जिल्ह्यात बळ दिलं जाण्याची शक्यता लंके यांच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.