‘हे’  खोटे असेल, तर सुजयला आता माझ्यासमोर आणा – अजित पवार

0
710

पुणे, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या तिकीटावर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो, मात्र सुजय यांनीच हा प्रस्ताव नकाराला होता. सुजयला आता माझ्यासमोर आणा, हे जर खोटे असेल, तर म्हणाल ते करायला मी तयारी आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सुजय यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यास मी स्वत: सांगितले होते,  पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला, असे पवार म्हणाले.

मावळ परिसरातील शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह  राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह केला होता, या सर्वांच्या भावनांचा आदर करुनच पार्थ  यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीला सर्वत्र वातावरण चांगले आहे. त्यामुळे या लोकसभेला आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास पवार यांनी  यावेळी  व्यक्त केला.