Maharashtra

” हे” आहेत ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

By PCB Author

December 27, 2019

मुंबई ,दि.२७ (पीसीबी) –राज्यात ठाकरे सरकारची सत्तास्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर ३० डिसेंबरला हा मंत्रिंडळ विस्तार होणार आहे. विधान भवनाच्या प्रांगणात या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्री सोमवारी शपथ घेणार आहेत. दरम्यान, यामध्ये एकूण ३६ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे

*कोण आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे-

शिवसेना- रविंद्र वायकर, तानाजी सावंत,संजय राठोड, गुलाबराव पाटील, सुनील राऊत, अनिल परब, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर, डाॅ. संजय रायमुलकर, उदय सामंत, अनिल बाबर, नीलम गोर्हे.

राष्ट्रवादी- अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ , नवाब मलिक, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, राजेश टोपे, अनिल पाटील, धर्मारावबाबा आत्राम, दत्ता भरणे , संजयमामा शिंदे. तरूण चेहरा म्हणून रोहीत पवार  याचं नाव सुद्धा चर्चेत आहे .

काॅंग्रेस – अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,विजय वड्डेट्टीवार, के.सी पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे , अमीन पटेल, सुनिल केदार.