Videsh

‘हे’ अँप आहे व्हॉट्सअँप पेक्षा सुरक्षित? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे ट्विट

By PCB Author

January 10, 2021

विदेश,दि.१०(पीसीबी) – व्हॉट्सअॅप नाही तर कोणते अ‍ॅप वापरावे. असं कोणतं अ‍ॅप आहे, जे WhatsApp सारख्या सुविधा पुरवू शकते. त्यांच्या गरजा पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे ज्यात आपला डेटा चोरी होऊ नये अशी खात्री असेल. जाणून घेऊया अशाच एका अ‍ॅपविषयी.

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्वीट करून आपल्या 41 दशलक्ष फॉलोअर्सला एक अ‍ॅप वापरण्याचा सल्ला दिला. हे अ‍ॅप Signal आहे. दोन शब्दांच्या या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे ट्विट अडीच लाखाहून अधिक लोकांना आवडले असून 30 हजाराहून अधिक रिट्वीट झाले आहेत. वास्तविक सिग्नल अ‍ॅप एक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. ज्याची टॅगलाइन वेलकम प्राइवेसी आहे. एलोन मस्क यांचे हे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा व्हाट्सएपच्या प्रायव्हसी धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे आणि ज्या सिग्नल अ‍ॅप बद्दल बोलले जात आहे त्या गोपनीयतेचा सर्वाधिक आदर करण्याचा दावा करीत आहे.

एलन मस्क यांच्या ट्विटनंतर सिग्नल अ‍ॅप वापरकर्त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की कंपनीला ट्विट करुन सांगावे लागले की मोठ्या संख्येने रिक्वेस्ट येत असल्याने खाते सक्रिय करण्यात अडचणी येत आहे आणि ती लवकरच सुधारली जाईल. सुरक्षा तज्ञ, संशोधन आणि मोठ्या संख्येने पत्रकारांशी संबंधित लोक जगभरात सिग्नल वापरत आहेत, पण आता ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. मस्क व्यतिरिक्त लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते लियाद-अल-बगदादी यांनीही व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप सोडचिठ्ठी देत सिग्नल वापरण्यास सांगितले आहे.

दरम्यान फेसबुकने विकल्यानंतर व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अ‍ॅक्टनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली. फेसबुक मेसेंजर प्रमाणेच हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप देखील जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते.