Pune

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे पालकमंत्री बापटांना निवेदन

By PCB Author

November 25, 2018

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त के व्यंकटेशम् यांनी १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. ही सक्ती हटवण्यासाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने आज (रविवार)  पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले.

हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने  म्हटले आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचे पालन पुणेकर करत आहेत. हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा  समितीने यावेळी दिला.

हेल्मेट सक्तीचा निर्णय केंद्राशी निगडीत आहे. तरी राज्य सरकार ,पोलीस आणि आरटीओशी चर्चा करून व्यवहारिक मार्ग काढू, असे आश्वासन गिरीश बापट यांनी यावेळी समितीला दिले.