Maharashtra

हेमंत करकरेंचे सहकारी रियाझ देशमुख साध्वी प्रज्ञासिंहविरोधात निवडणूक लढवणार  

By PCB Author

April 25, 2019

औरंगाबाद,  दि. २५ (पीसीबी) – दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे माजी सहकारी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून आपला अपक्ष  म्हणून  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीच  आपण साध्वीविरोधात निवडणूक लढवण्याचा  निर्णय घेतला होता, असे  देखमुख यांनी  सांगितले.  मुंबई पोलिस दलातील सर्वात उत्तम आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदनामी  होत असताना  आपण नुसते  डोळ्यांनी बघू शकत नाही. करकरे यांनी नेहमीच मला चांगले मार्गदर्शन केले आहे. ते नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले आहेत, असेही देशमुख म्हणाले.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना २०१७ मध्ये जामीन मंजूर झाला आहे. त्यापूर्वी  त्यांना ९ वर्षे तुरुंगात  राहावे लागले होते.  दरम्यान साध्वी यांनी दिवंगत हेमंत करकरे यांच्याविषयी अवमानकारक विधाने केली आहेत. यावरून साध्वी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अखेर साध्वी यांनी आपल्या विधानावर माफी मागितली होती.