Desh

हेडलाइन मॅनेजमेंट नको; आर्थिक मंदी असल्याचे मान्य करा – प्रियंका गांधी  

By PCB Author

September 03, 2019

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचे सरकारने मान्य करायला हवे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी ट्विटद्वारे भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  

प्रियंका म्हणाल्या की,  कोणतेही खोटे शंभरवेळा सांगितल्याने ते खरे होत नाही. भाजप सरकारला आता हे मान्य करायला हवे की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे. मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकित केले होते. याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असे म्हटले होते. याला त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची घाईगडबडीत केलेली अंमलबजावणीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.