Maharashtra

…हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल: राज ठाकरे

By PCB Author

December 06, 2019

महाराष्ट्र, दि.६ (पीसीबी) –  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटवरुन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल. #महामानव pic.twitter.com/FdLAEAYQIg

— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019