Maharashtra

“ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे”

By PCB Author

September 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) : अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना वाद अजूनही सुरूच आहे. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त म्हंटल्याने तिच्यावर टीका झाली. कंगनाच्या विधानांवरून चर्चा सुरू असतानाच हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल आपली भूमिका मांडली आहे. मात्र, अनुरागच्या भूमिकेचा संदर्भ देत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं आहे.

कंगनानं अनेक विधान केली. याच विधानांना जोडून कंगनानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. या वादात अनुराग कश्यपनं ‘आपल्याला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझी शिवसेनेबद्दलची मतंही बदलली,’ असं मत ट्विटद्वारे व्यक्त केलं.

एका मुलाखतीत बोलताना अनुराग कश्यप म्हणाला होता कि, “मी कोणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच फार सुरक्षित वाटतं. येथे मी खुलेपणाने माझं मत मांडू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पाहून शिवसेनेबद्दलची माझी मतं पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं. सध्या पाहायला गेलं तर केंद्र सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याचा विरोध मी करत आहे,”

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे.

हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…. pic.twitter.com/as6mWsRcSK

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2020

मात्र आता यावर निलेश राणेंनी आपलं मत व्यक्त करत ट्विट केलं आहे कि, “उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबाच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…,” असं निलेश राणे ट्विट करत म्हणाले.