ही तर केवळ सुरुवात, पुढे आणखी मज्जा येणार आहे – राहुल गांधी

0
586

अमेठी, दि. २५ (पीसीबी) – ही तर केवळ सुरुवात आहे. पुढे तर आणखी मज्जा येणार आहे’, अशी टिप्पणी करून मोदी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात घोटाळा कसा झाला हे येत्या काही महिन्यात उघड करणार आहे, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला.  अमेठी दौऱ्यावर  राहुल गांधी  असून यावेळी त्यांनी  राफेल करारावरून भाजपवर जोरदार  निशाणा साधला. 

‘राफेल खरेदीत मोदींनी अनिल अंबानींची बाजू घेत भ्रष्टाचाराला  प्रोत्साहन दिले आहे. जी व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी आली होती, तिनेच अंबानीला ३० हजार कोटींचे घबाड दिले आहे.  येत्या २-३ महिन्यात तुम्हाला अशा अनेक गोष्टी दाखवू’, असे ते म्हणाले.

‘राफेल, ललित मोदी, विजय मल्ल्या, नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स ही सर्व मोदींची कामे आहेत. त्या प्रत्येक कामात चोरी आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.  मोदी चौकीदार नाहीत तर चोर आहेत. हे आम्ही एक-एक घोटाळा बाहेर काढून दाखवून देणार आहोत’, असा दावाही त्यांनी केला.