ही काय मोघलाई आहे का ? – भाजप नेते राम कदम

0
558

 

मुंबई, दि.८ (पीसीबी) – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केलेल्या ठाण्यातील तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन दिले जात नाहीये, असे लिहित भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे. पोलिसांनी मला माझ्या घराच्या इथे अडकवून ठेवले आहे. त्यामुळे मला अनंत करमुसे यांना भेटता येत नाहीये, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवल्याच्या घटनेचा भाजप नेते राम कदम यांनी निषेध केला आहे. ही काय मोघलाई आहे का ? असे ट्विटमध्ये लिहित राम कदम यांनी निषेध केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मा खासदार किरीट सोमय्या यांना नीलम नगर येथे पोलिसांनी अटक केली मुलुंड येथे पोलीस घेऊन जात आहेत ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या पीडित युवकाला विचारपूस करण्यासाठी @KiritSomaiya arrest करणे हे कितपत योग्य ?? ही तर मोगलाई आहे . सरकारच्या या भ्याड कारवाईचा निषेध….!