‘ही’ आहेत भारतातील श्री शिवशंकरांची प्रसिद्ध ‘१२ जोतिर्लिंग’

0
679

अखंड भारत हा धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा आहे. देव आणि भक्त यांचे भारतामध्ये वेगळे समीकरण आहे. येथे लोकांच्या भावना देवांशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. देव आजही या भूतलावर कोणत्यानाकोणत्या रूपाने आहेत याच भारतात असलेली बारा जोतिर्लिंगे हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्रिमूर्ती दत्तात्रयांपैकी एक म्हणजे श्री शिवशंकर. विनाशाचा देव. पौरुषत्वाचा आदर्श, समस्त महिला वर्ग तपस्या करून मागेल असा पती, तपश्चर्येला लवकर फळ देणारा भोळा शंकर. देशात सर्वाधिक मंदिरं ज्या देवाची आहेत ती म्हणजे महादेव शिवशंकर यांची. त्यातील बारा जोतिर्लिंगे खुपच प्रसिद्ध आहेत.

  • चला पाहुयात भारतात असलेली हि बारा जोतिर्लिंगे…

१. ओंकारेश्वरओंकारेश्वर मंदिर हे नर्मदेकाठच्या शिवपुरी या लहानशा बेटावर आहे. या ओंकार मंदिराला अमरेश्वर मंदिर असंही संबोधलं जातं. या बेटाचा आकार ‘ओम’कार स्वरुपाचा असल्याचं म्हटलं जातं. भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात.

२. मल्लिकार्जुनकृष्णा नदीतीरावर असलेल्या शिखरावर वसलेल्या या मल्लिकार्जुन या मंदिराला श्रीशैल मल्लिकार्जुन असंही म्हंटल जात. असं म्हणतात कि, याच ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी शिवानंद लहरी रचलं होतं. आंध्र प्रदेशच्या कुनरूल जिल्ह्यात हे मंदिर असून या मंदिराच्या स्थापत्यशैलीबद्दल हे मंदिर प्रसिद्ध आहे.

३. केदारनाथउत्तराखंडामध्ये हिमालयाच्या गढवाल पट्ट्यात केदारनाथाचा निवास आहे. केदारनाथ मंदिर हे मंदाकिनी नदीच्या तटनिकटी आहे. बहुतांशवेळा हे मंदिर बर्फाच्छादित असतं. या मंदिरात प्रवेश करणं बर्फामुळे खूप कठीण असतं. भाविक खूप श्रद्धेने इथे दर्शनासाठी येतात.

४. महाकालेश्वरमध्यप्रदेश मधील उज्जैन येथे महाकाल हे स्वयंभू शिवलिंग वसलेले आहे. हे शिवलिंग दक्षिणाभिमुख असून बारा ज्योतिर्लिंगांपकी हे एकमेव शिवलिंग आहे, जेथे गर्भगृहच्या छतावर ‘श्री यंत्र’ कोरलेलं आहे.

५. वैद्यनाथझारखंडमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मूळ ठिकाण असल्याचं म्हटलं जातं, तर दुसऱ्या मतप्रवाहाप्रमाणे हिमाचल प्रदेशात वैजनाथ असल्याची मान्यता आहे. महाराष्ट्रात असणारं परळी वैजनाथ हे देखील वैद्यनाथ शिवलिंग असल्याचं काही जणांचं मत आहे.

६. त्र्यंबकेश्वरमहाराष्ट्रातील नाशिकमद्धे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर हे मंदिर असून या मंदिरातील शिवलिंग त्रिमुखी आहे. हे लिंग ब्रह्म, विष्णू आणि शिव या तीनही देवतांचं प्रतिनिधित्व करतं. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसलेलं आहे. येथे धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर चालतात.

७. भीमाशंकर

महाराष्ट्रातल्या पुण्याजवळ भीमाशंकर आहे. ‘शिवपुराणा’त वर्णन केलेलं भिमाशंकर हे आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे असं बऱ्याच जणांच म्हणणं आहे. तर ‘लिंग पुराणा’त वर्णन केल्याप्रमाणे भीमाशंकर हे ओडीशामध्ये आहे. मात्र पुण्याजवळील भीमाशंकर यालाच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जात आहे. येथे भाविकांची कायम गर्दी असते.

८. घृष्णेश्वरऔरंगाबादच्या वेरुळ गुंफांजवळ असणारं घृष्णेश्वर येथील शिवलिंगाची कथा खूपच छान आहे. भगवान शंकराने एका मातेला तिचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून दिला असल्याचं म्हंटल जातं. यानंतर शिवशंकर लिंगरुपाने याच ठिकाणी कायमस्वरूपी राहिल्याचं म्हटलं जातं.

९. नागेश्वरदुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर जे गुजरातमध्ये आहे. शिवपुराणाप्रमाणे नागेश्वर दारुकावनातील घनदाट देवदार जंगलामध्ये वसलेलं आहे. या वर्णनानुसार उत्तराखंडाला पूर्वी दारुकावन म्हणतात. आणि गुजरातमधील द्वारका परिसरात जरी याचा कुठलाही संदर्भ आढळत नसला, तरीही आज नागेश्वर मंदिर गुजरातमध्येच असल्याचं मानलं जातं.

१०. काशी विश्वनाथगंगा नदीच्या घाटावर काशी म्हणजेच बनारस येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक काशी विश्वनाथ आहे. विश्वनाथचा अर्थ विश्वाचा नाथ म्हणजेच स्वामी असा होतो. बनारस हे जगाच्या इतिहासातील काही प्राचिन शहरांपैकी एक शहर मानले जाते. या शहराचा लिखित इतिहास ३५०० वर्षं जुना आहे.

११. रामेश्वरमआणखी एक जोतिर्लिंग म्हणजे भारताच्या सर्वांत दक्षिणेकडे असणारं रामेश्वरम ज्योतिर्लिंग. या ठिकाणी भगवान शंकराची भगवान श्रीरामाने उपासना केली होती. रावणाविरुद्ध लढण्याचं पाप धुण्यासाठी श्रीरामाने भगवान शंकराची जिथे उपासना केली ते रामेश्वरम हे चारधाम यात्रेपैकी एक तीर्थक्षेत्र आहे.

१२. सोमनाथगुजरातमधील सर्वात जास्त पवित्र मानलं जाणार श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे सोमनाथ. सोमनाथचं विधीप्रमाणे प्रथम दर्शन घेऊनच पुढील ज्योतिर्लिंगं पाहावीत. काही काळापूर्वी हे मंदिर उध्वस्त करण्यात आलं होतं आणि १६ वेळा बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सोम म्हणजे चंद्राने हे मंदिर सुवर्णाने बांधलं होतं, असं म्हणतात.