हि अभिनेत्री घेणार ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून एक्झिट?

0
414

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : छोट्या पडद्यावरील ‘झी’ ची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका सध्या सुपरहिट होत असून या मालिकेती सगळी पात्र सतत चर्चेत असतात. त्यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मधल्या काळात तिने काही कारणास्तव या मालिकेतुन ब्रेक घेतला होता आणि कालांतराने तिने पुन्हा एकदा या मालिकेत दमदार एंट्री घेतली होती. शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर.जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून कायमची एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच तिच्या पात्राला आता पूर्णविराम मिळणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आता येणारे पुढचे भागच सांगतील कि शनाया यापुढे मालिकेत दिसणार कि नाही.