हिम्मत असेल, तर काँग्रेसने संघाच्या शाखांवर बंदी आणावी – शिवराज सिंह

561

भोपाळ, दि. १३ (पीसीबी) – मध्यप्रदेशात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखांमध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होतील. आणि त्यांना कोण रोखू शकत नाही. नेहरुंची काँग्रेस संघावर बंदी आणू शकली नाही, सध्याची काँग्रेसला तर ते कधीही शक्य होणार नाही. संघ देशभक्तांची शाखा आहे, अशा शब्दांत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.  

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या वचननाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघ शाखेत जाण्यावर आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात संघाच्या शाखांवर निर्बंध लावण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया  म्हणाले की, ही जुनी विचारधारा आहे. नियमानुसार कोणताही सरकारी कर्मचारी राजकीय संघटनेशी जोडू शकत नाही. धर्माला राजकारणात आणू नये आणि राजकारण धर्मात आणू नये.  यावर  शिवराज सिंह यांनी टीका केली आहे.

संघाच्या शाखामध्ये शिस्त आणि राष्ट्र निर्माण शिकवले जाते. त्यामुळे संघाच्या शाखा आता सरकारी कार्यालयांमध्येही सुरू करणार  आहे. कर्मचारी त्यात सहभागी होतील, असे सांगून शिवराज सिंह यांनी  संघाच्या शाखांवर कुणीही बंदी आणू शकत नाही, काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी संघाच्या शाखांवर बंदी आणून दाखवावी, असे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले आहे.