हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून ७ ठार, मृतांमध्ये ६ जवानांचा समावेश

0
411

हिमाचल, दि, १५ (पीसीबी) –  हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी इमारत कोसळून ७ जण ठार झाले आहेत. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. त्यानंतर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जणांची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे. मृतांमध्ये ६ लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे.

सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत १७ जवानांची सुटका करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या दुर्घटनेत ६ जवान आणि १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. ७ जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.