New Delhi: Bollywood actor Akshay Kumar during an event, in New Delhi on Monday, May 28, 2018. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI5_28_2018_000159B)

Maharashtra

हिंसाचार करणाऱ्यांना अक्षय कुमारने केली “ही” विनंती

By PCB Author

December 28, 2019

मुंबई, दि.२८ (पीसीबी) –देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात संपूर्ण देशभरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने देशातील जनतेला हिंसा न करण्याची विनंती केली आहे.

एका खासगी कार्यक्रमावेळी अक्षय कुमाने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधातील हिंसक आंदोलनाच्या विरोधात सर्व देशातील जनतेला आग्रहाची विनंती करत म्हटले की,’मला हिंसा आवडत नाही मग ते डाव्या विचारसरणीचे असो व दक्षिणेतील असो, हिंसक आंदोलनमुळे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते म्हणून नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करू नका, तुमचे मत सकारात्मकतेने मांडा, या मुद्यावर चर्चा मार्ग काढा.’ असं म्हणत अक्षय कुमारने हिंसाचार करू नका असे आवाहन केले आहे.