Maharashtra

हिंमत असेल तर स्वत: मैदानात उतरा; पंकजा मुंडेंचे धनंजय मुंडेंना आव्हान

By PCB Author

March 26, 2019

बीड, दि. २६ (पीसीबी) – धनंजय मुंडे तुम्ही स्वत: लोकसभा निवडणूक का लढवत नाही? असा सवाल महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. आणखी एक दिवस उमेदवारी अर्ज भरायला बाकी आहे, तर तुम्ही स्वत: मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना प्रचार सभेत जाहीर आव्हान दिले आहे.

राज्याचे नेतृत्व करतो, असे म्हणणारे मागच्या दाराने येतात, स्वत: मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात, असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले. मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा सवालही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केला.