Desh

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या

By PCB Author

October 18, 2019

लखनऊ, दि.१८ (पीसीबी) – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची लखनऊ या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलिस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.

#Lucknow : शादी के विवाद को लेकर हुई कमलेश की हत्या।
मुस्लिम लड़की और हिंदू लड़के की शादी को लेकर दोनों लोगों में चल रही थी चर्चा।
नौकर स्वराष्ट्रजीत सिंह ने दही बड़ा और चाय देने के बाद सुनी थी दोनों की बात
नौकर को बाहर सिगरेट लाने के लिए भेज वारदात को अंजाम देकर बदमाश हुए फरार pic.twitter.com/U568w4zJJE

— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) October 18, 2019