Desh

हिंदू मंदिराची तोडफोड प्रकऱणी या क्रिकेटपटूने केली नाराजी व्यक्त ….

By PCB Author

December 22, 2021

कराची, दि. २२ (पीसीबी) – पाकिस्तानमध्ये दररोज मंदिरांचे नुकसान होत आहे. या देशात हिंदूंवरील हल्ल्याच्या बातम्या रोज समोर येत असतात. नुकतेच कराचीमध्येही एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले. याबाबत पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक व्हिडिओ पोस्ट करून हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कनेरियाने पंतप्रधान इम्रान खान यांना धार्मिक स्वातंत्र्य वाचवण्याचे आवाहन केले आहे. दानिश कनेरिया हा काही हिंदू क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांना पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली. कनेरियाने आज बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ एका मंदिराचा आहे. यामध्ये मंदिराची आतून तोडफोड करण्यात आली असून, दुर्गेच्या मूर्तीचीही विटंबना करण्यात आली आहे.