हिंजवडी, मान, मारुंजी, जांबे, नेरे आठवडाभर बंद

436

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीसह परिसरात उद्यापासून (गुरूवार) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत लॉकडाउन पाळण्यात यावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. हिंजवडीसह मान, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणी ही लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना यामधून वगळण्यात आल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

हिंजवडी परिसरात उद्यापासून १६ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाउन पाळला जाणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आले आहे. अशी माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजी सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा वळगून पहाटे ६ ते ९ यावेळेत दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, ही कडक पावलं उलचण्यात आल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंजवडी परिसरात विनामास्क नागरिक आढळल्यास त्याला ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.