Chinchwad

हिंजवडी चौकीत पोलीसाला शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न

By PCB Author

January 29, 2019

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – पोलीस चौकीत कर्तव्य बजावत असताना एका पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी एमआयडीसी पोलीस चौकीत घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई नंदराज तुकाराम गभाले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, केतन माधव गावंडे (वय ३०, रा. रुम नं.१०५, ओंकार अपार्टमेंट मानपाडा, दिवा ईस्ट, ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस शिपाई नंदराज गभाले हे हिंजवडी एमआयडीसी पोलीस चौकीत कर्तव्य बजावत असताना आरोपी केतन गावंडे याने नंदराज यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी केतन याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.