Chinchwad

हिंजवडीत सहावीतील मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग; शिक्षकाला अटक

By PCB Author

September 28, 2018

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – वर्गात मैत्रिणी सोबत बसलेल्या सहावीत शिकणाऱ्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार हिंजवडी परिसरातील जिल्हा परिषद शाळेत घडला. या प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

संतोष हरिभाऊ भेगडे (वय ४२, रा. शिंदेवस्ती, नांदेगाव, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एका शिक्षीकेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी हिंजवडी परिसारतील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. तर भेगडे हा त्यांचा वर्गशिक्षक आहे. एक महिन्यापुर्वी पीडीत मुलगी आणि तिची मैत्रीण दुपारी साडेतीनच्या सुमारास वर्गात बसल्या होत्या. त्यावेळी भेगडे तिथे आले आणि त्याने पीडीत मुलीच्या मैत्रीणीला बाहेर पाठवले. त्यानंतर तिच्याशी जवळीक, लगट करून विनयभंग केला. हिेंजवडी पोलिस तपास करत आहेत.