हिंजवडीत महिला वाहतुक पोलिसाला शिवीगाळ; आरोपी अटकेत

0
780

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने कार मागे घेण्यास सांगिल्याच्या कारणावरुन एका कारचालकाने हिंजवडीतील वाहतुक विभागात कार्यरत असलेल्या महिला वाहतुक पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार (दि.१) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडीतील इंडियन ऑईल पंपाच्यासमोर घडली.  

लता अंबरगी असे शिवीगाळ झालेल्या महिला वाहतुक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार आरोपी कारचालक सागर निवृत्ती शितोळे (वय ३२, रा. आदर्शनगर, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास महिला वाहतुक पोलीस लता अंबरगी या हिंजवडीतील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर वाहतुक नियमन करत होत्या. यावेळी आरोपी सागर याने त्याची कार रस्त्यातच उभी केली. यामुळे वाहतुकीस आढथळा होऊन ट्रॅफीक जाम झाले. लता यांनी सागरला कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र सागरने लता यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन ‘ मी गाववाला आहे, थांब मी आमदाराला फोन लावतो’, असे बोलून दमदाती करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावर लता यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी कारचालक सागर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.