हिंजवडीत पोलीस असल्याचे सांगून तरुणाला लुटले; पाच लाखांचा ऐवज केला लंपास

0
702

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – चार जणांच्या टोळक्यांनी एका १८ वर्षीय तरुणाला पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्याकडील चार लाख रुपये किमतीची होन्डा सीटी कार, ५० हजारांचे दोन तोळे सोन्याचे कडे आणि ६० हजार रुपये किमतीचा एक अॅपल कंपनीचा मोबाईल जबरदस्ती चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री सव्वानऊच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन एचईएमआरएल कंपनीसमोर घडली.