Chinchwad

हिंजवडीत पितापुत्राला जीवेठार मारण्याचा प्रयत्न; पाचजण अटकेत

By PCB Author

July 18, 2019

हिंजवडी, दि. १८ (पीसीबी) – पाच जणांच्या टोळक्यांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन पितापुत्राला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १६) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथील चिडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे घडली.

ज्ञानेश्वर सतु केदारी आणि दत्तात्रय ज्ञानेश्वर केदारी असे जखमी पितापुत्राची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, आकाश रोहिदास मेटे (वय २४, रा. दुसाने ता. मावळ), आकाश लक्ष्मण कांबळे (वय २१, रा. थेरगाव. मूळ रा. शिंदेगे, ता. सोलापूर), शैलेश शांताराम भोईर (वय ३२, रा. भोईरवाडी, जय गणेश कॉलनी, ता. मुळशी), कृष्ण रमेश कडेळ (वय २०, रा. साखरे वस्ती हिंजवडी. मूळ रा. गोपाळपूर बीड) आणि राजाराम खेंगरे (वय २१, रा. साखरे वस्ती हिंजवडी) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी ज्ञानेश्वर यांचा मुलगा दत्तात्रय याच्या बरगडीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये दत्तात्रेय गंभीर जखमी झाला. तसेच इतर आरोपींनी ज्ञानेश्वर यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले. सध्या या दोघांवरही एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हिंजवडी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. भांडणामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करत आहेत.