Chinchwad

हिंजवडीत पावनेदोन लाखांचे महागडे नळ चोरट्यांनी पळवले

By PCB Author

January 24, 2019

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – बांधकाम साईटवरील इमारतीमध्ये बसवण्यासाठी आणलेले ब्रॅण्डेड कंपनीचे महागडे नळ दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना रविवार (दि.१३) सकाळी सात ते नऊच्या दरम्यान सुसगाव येथील ऑक्सफोर्ड पॅराडाईज सोसायटी येथे घडली.

याप्रकरणी संदीप भास्कर बडे (वय ३७, रा. गांधीनगर झोपडपट्टी, नीता पार्क सोसायटीजवळ, येरवडा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे ऑक्सफोर्ड पॅराडाईज सोसायटीमध्ये नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतींमध्ये जॅग्वार कंपनीचे महागडे असे १ लाख ९० हजार ८०० रुपये किमीचे नवे नळ बसवण्यासाठी आणण्यात आले होते. ते बांधकाम साईटवरील एका स्टोररुममध्ये ठेवले होते. यादरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ते नळ चोरुन नेले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.