हिंजवडीत दुचाकीस्वार तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरताना आढळल्याने खळबळ

0
1882

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – हिंजवडी परिसरात शनिवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास एका दुचाकीवरुन दोन तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली.

सध्या पुलवामा हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त होत असताना तसेच देशात संतापाची लाट असताना हिंजवडी आयटी पार्क परिसरात काही तरुण दुचाकीवरुन पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरताना पुणे पोलिसांना त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज नियंत्रण कक्षात समाजले. पुणे पोलिसांनी तातडीने याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिली.  पोलिसांनी हिंजवडीसह आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात अलर्ट जारी केला. त्यानुसार  हिंजवडी, वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या तरुणांचा शोध लागला नाही. सध्या त्या तरुणांच्या शोधात पोलिसांची एक टीम हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरात घेत आहे.