Chinchwad

हिंजवडीत दुचाकीच्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू

By PCB Author

June 19, 2019

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – एका दुचाकीवरुन घरी निघालेल्या दोन मित्रांचा ब्रीजच्या लोखंडी संरक्षण कठड्याला धडकून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बावधन ब्रीजवर घडली.

कुणाल दिपक कुचेकर (वय १८, रा. बकाजी कॉर्नर बावधन) आणि नागेश बाळु लोंड (वय १६, रा. निम्हण भट्टी, पाषाण) असे मृत दोघा मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.१२ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास कुणाल आणि त्याचा अल्पवयीन मित्र नागेश हे दोघे त्याच्या (एमएच/१२/सीएल/४७४६) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन घरी निघाले होते. यावेळी त्यांची दुचाकी थेट बावधन ब्रीजच्या लोखंडी कठड्याला जावून धडकली. या भीषण अपघातात कुणाल आणि नागेश या दोघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.