हिंजवडीत खाजगी कारने प्रवास करणे पडले महागात; चाकूचा धाक दाखवून चालत्या कारमध्ये दोघांनी एकाला लुटले

0
416

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – खाजगी कारने मुंबईला निघालेल्या एका प्रवाशाला दोन अज्ञात तरुणांनी चाकून धाक दाखवून त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्ती चोरुन नेला. त्यानंतर प्रवाशाला निर्जनस्थळी सोडून चोरटे पळून गेले. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाकड ब्रीज ते भुमकर चौक दरम्यान घडली.