Chinchwad

हिंजवडीत आयटी अभियंत्याची इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

By PCB Author

September 14, 2018

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – हिंजवडी आयटी पार्कमध्यील टेक महिंद्रा कंपनीत कामाला असलेल्या एका आयटी अभियंत्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी सातच्या सुमारास  हिंजवडी फेज तीन येथील मेगापोलीस सोसायटी येथे घडली.

विद्यासागर पाथा (वय २५, रा. मेगा पोलीस ओसायटी, हिंजवडी, मूळ रा. विशाखापट्टणम) असे आत्महत्या केलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हिंजवडी येथील मेगा पोलीस सोसायटीमध्ये राहणाऱ्या विद्यासागर याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची  माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता विद्यासागर रक्ताच्या थारोळ्या पडला होता. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विद्यासागर हिंजवडी फेज तीन मधील टेक महिंद्रा कंपनीत चांगल्या पदावर  कामाला होते. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.