हिंजवडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

743

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१४) रात्री साठेआठच्या सुमारास हिंजवडी फेज-२, विप्रो सर्कल येथे घडली.

रविदास भोळा (वय ३०, पत्ता समजु शकला नाही) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साठेआठच्या सुमारास हिंजवडी फेज-२, विप्रो सर्कल येथे अज्ञात भरधाव वाहनाने रविदास या तरुणाला जोरदार धडक दिली. या घटनेत रविदास याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक वाहनासह पसार झाला. हिंजवडी पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.