हिंजवडीतील कासारसाई येथील बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

0
668

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील कासारसाई येथे चॉकलेटचे अमिष दाखवून ऊसतोड मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना रविवारी (दि.१६ सप्टेंबर) घडली होती. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला होता. या घटने बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून त्या दोन मुलींवर दोघांनी नाही तर एकूण चौघांनी बलात्कार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.